Site icon

नाशिक : लैंगिक सतवणूक करणाऱ्यास नऊ महिने कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन मुलीस व्हिडिओ कॉलवरून लैंगिक सतवणूक करणाऱ्यास न्यायालयाने पाेक्सो कायद्यातंर्गत नऊ महिने १५ दिवसांचा कारावास व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सोहम प्रवीण वनमाळी (२२, रा. टाकळी रोड, द्वारका) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

अल्पवयीन पीडितेच्या फिर्यादीनुसार, नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ या कालावधीत सोहमने तिच्या इच्छेविरोधात व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. तसेच बदनामीची धमकी देत तिच्याकडे पैसे मागितले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात सोहम विरोधात पोक्सोसह विनयभंग, खंडणीचा गुन्हा दाखल होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. सी. बारेला यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे शिरीष कडवे यांनी युक्तिवाद केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. भालेराव यांनी सोहमला शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस नाईक एस. एस. गायकवाड, हवालदार पी. व्ही. पाटील यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा : 

The post नाशिक : लैंगिक सतवणूक करणाऱ्यास नऊ महिने कारावास appeared first on पुढारी.

Exit mobile version