नाशिक : लोहोणेर येथे शेतकऱ्यांचा केंद्र सरकारच्या विरोधात रास्ता रोको

शेतकरी आंदोलन,www.pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला आहे. या शुक्ल वाढीमुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार असून या निर्णयाच्या विरोधात आज मंगळवारी दि. २२ रोजी लोहोणेर येथे महामार्गावर माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.

आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक निकम, उपाध्यक्ष रवींद्र शेवाळे, प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष क्रुष्णा जाधव, योगेश पवार, स्वप्निल कोठावदे, कैलास अहिरे, योगेश अहिरे, सचिन अहिरे, सतीश शेवाळे, राहुल अहिरे, गोरख शेवाळे, संतोष शेवाळे, ज्ञानेश्वर शेवाळे, बंडू शेवाळे, भाऊसाहेब अहिरे, अजय सोनवणे, मिलिंद धोंडगे, कैलास जाधव, मंगेश सोनवणे, मनोज धामणे, निलेश देशमुख ,गोरख बागुल, बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देविदास आहीरे, कळवण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रामकृष्ण जाधव, देवळा तालुका अध्यक्ष कैलास कोकरे, समाधान महाजन, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रमेश आहीरे, शिवसेनेचे कारभारी पगार, अशोक अलई, अनिल आहेर, पि. डी निकम, किरण निकम, पंकज बोरसे, धनंजय बोरसे आदीसह शेकडो कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सपोनि दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते असून या धोरणांचा निषेध करण्यासाठी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दि. 24 रोजी चांदवड येथील बाजार समितीच्या आवारासमोर मुंबई आग्रा महामार्गावर भव्य रास्तारोको आंदोलन छेडण्यात येणार असून यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्नवयक कुबेर जाधव यांनी केले.

हेही वाचा :

The post नाशिक : लोहोणेर येथे शेतकऱ्यांचा केंद्र सरकारच्या विरोधात रास्ता रोको appeared first on पुढारी.