
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
वडनेरभैरवच्या महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर हेल्थद्वारे आरोग्य जगजागृतीचा संदेश देण्यात आला. वडनेरभैरव पोलिस ठाणे ते शिरवाडे फाटा हे दोन किलोमीटर अंतर विद्यार्थी व प्राध्यापक यांनी पळून धावणे आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हा संदेश यानिमित्ताने नागरिकांना दिला. रनचे उद्घाटन प्राचार्य ए. एल. भगत यांनी केले. रन फॉर हेल्थ स्पर्धेत जवळपास तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्रीडा अधिकारी सी. ए. मोरे, जी. आर गवळी व इतर सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
हेही वाचा:
- Nashik : संभाजीराजेंना विरोध करणार्यांविरोधात नाशिकमध्ये निदर्शने
- नाशिकमधील 31 ठिकाणे धोकादायक; दुर्घटना घडल्यास अग्निशमन पोहोचणेही आहे कठीण
- Nashik : संभाजीराजेंना विरोध करणार्यांविरोधात नाशिकमध्ये निदर्शने
The post नाशिक : वडनेरभैरव महाविद्यालयात 'रन फॉर हेल्थ' appeared first on पुढारी.