नाशिक : वणीत द्राक्ष, टोमॅटो कॅरेटच्या गोडावूनला आग

wani www.pudhari.news

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

औताळे (ता. दिंडोरी) शिवारातील द्राक्ष व टोमॅटो कॅरेटच्या गोडावूनला आग लागून हजारो रुपयांचे कॅरेट आगीत भस्मसात झाले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखाेंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मंगळवारी (दि. १) दुपारी द्राक्ष व्यापारी शीतलदास यांच्या यांच्या गोडाऊनमध्ये शेडच्या दुरुस्तीचे काम चालू होते. येथे वेल्डिंगचे काम चालू असताना ठिणगी पडली. यावेळी नेमके कामगार काही कामासाठी दुसरीकडे गेले असता गोडाऊनने अचानक पेट घेतला. या ठिकाणी अग्निशमन व्यवस्था नसल्याने बादलीने पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, आग विझविण्यासाठी पिंपळगाव येथून अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, आगीने उग्र रूप धारण केल्याने आग विझवण्याचा स्थानिकांचा प्रयत्न तटपुंजा ठरला. घटनेबाबत माहिती कळताच वणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सोनवणे, पोलिस कर्मचारी विजय बच्छाव, कुणाल मराठे हे घटनास्थळी दाखल झाले. वणी परिसरात अग्निशमन व्यवस्था नसल्याने पिंपळगाव किंवा नाशिक येथून अग्निशमन गाड्या बोलवाव्या लागतात. त्या येईपर्यंत बरेच नुकसान झालेले असते. प्रशासनाने या बाबत उपाययोजना करणे अपेक्षित आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : वणीत द्राक्ष, टोमॅटो कॅरेटच्या गोडावूनला आग appeared first on पुढारी.