Site icon

नाशिक : वणी येथे १४ ऑक्टोबर’ला बुद्ध मूर्तीची स्थापना

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
वणी येथे बुध्द विहारात (दि.१४) ऑक्टोबर रोजी तथागत गौतमबुध्दांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. १४ ऑक्टोबर हा दिवस बौद्ध धर्मियांसाठी खूप मोठा दिवस आहे. याच दिवशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. याच दिनाचे औचित्य साधून थायलंड येथून आणलेल्या बुध्द मूर्तीची स्थापना पुज्य भन्ते आर्यनाग व त्यांच्या सहका-यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या निमित्ताने दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असून संपुर्ण परिसरात पंचशीलच्या झेंड्याने सजवले आहे. शहरात खूप छान व उत्साहपूरण वातावरण  आहे. दि.१२ ऑक्टोबर रोजी युवा काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दि.१३ ऑक्टोबर रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धम्म या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील यांचे व्याख्यान सांय.७.३० वाजेला होणार आहे. सावित्रीची ओवी मेघना व वैभवी तसेच सत्यशोधक सावित्री एकपात्री नाटक धम्मगौतमी धिवरे या सादर करणार आहे.

मूर्ती स्थापनेच्या दिवशी १४ ऑक्टोबरला सकाळी शोभायात्रा नंतर पुज्य भन्ते आर्यनाग यांच्य हस्ते मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. दुपारी अन्नदाचा कार्यक्रम असेल रात्री शाहिर मेघानंद जाधव यांच्या समाज प्रबोधनपर भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे बुध्दमूर्ती स्थापना कमिटी वणी बौद्धबाधंवाच्या वतीने जाहिर करण्यात आले.

हेही वाचा :

The post नाशिक : वणी येथे १४ ऑक्टोबर'ला बुद्ध मूर्तीची स्थापना appeared first on पुढारी.

Exit mobile version