
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र व गुजरातच्या सीमावर्ती भागात साग, खैर या वृक्षांसह वन्यजीवांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. शुक्रवारी (दि.१७) पहाटे उंबरठाण वनपरिक्षेत्रात अवैध मार्गाने होणारी खैर प्रजातीच्या लाकडाची वाहतूक रोखण्यात वनविभागाला यश आले आहे. या कारवाईत वनविभागाच्या पथकाने तब्बल सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
उंबरठार वनपरिक्षेत्रातील गोंदुणे बिटच्या कक्ष क्रमांक पाच राखीव वनक्षेत्रातून अवैधरीत्या खैर प्रजातीचे वृक्षतोड करून वाहतूक होणार असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. उंबरठाण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसह परिमंडळ हडकाईचौंडमध्ये गस्त करत असताना पहाटेच्या सुमारास नियतक्षेत्र गोंदुणे राखीव वनकक्ष क्रमांक पाचच्या नाल्यालगत महिंद्रा मॅक्स पिकअप (जीजे ०५, वायवाय ००२५) मध्ये १५ ते १६ संशयित खैर प्रजातीच्या झाडांची तोड करून तयार केलेले नग भरता आढळून आले. वनकर्मचारी येत असल्याची चाहूल लागताच संशयितांनी जंगलात पोबारा केला. वनपथकाने संशयितांचा पाठलाग केला. मात्र, संशयित तस्कर पळून जाण्यात यशस्वी ठरले. १०/०.६५४ घनमीटर खैर लाकडाचे नग आणि पिकअप असा ४ लाख २४ हजार ६९४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक उमेश वावरे, दक्षता विभागाचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी, सुरगाणा सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव संरक्षण) हेमंत शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे, वनपाल मंगेश शेळके, वनरक्षक गोविंद वाघ, रामजी कुवर, जेजीराम चौरे, हरी चव्हाण, वामन पवार, नवनाथ बंगाळ, यशिनाथ बहिरम आदींनी कारवाईत सहभाग नोंदविला.
हेही वाचा :
- TATA IPL: राजस्थान रॉयल्सला झटका, 10 कोटींचा ‘हा’ गोलंदाज स्पर्धेतून बाहेर
- IND vs AUS 2nd Test : भारताला पहिला धक्का, केएल राहुल 17 धावांवर बाद
- नगर : नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात कोतुळचे मुख्याध्यापक, शिक्षक ठार
The post नाशिक : वनविभागाने रोखली खैरची तस्करी appeared first on पुढारी.