नाशिक : वयोवृद्ध महिलेवर हल्ला करीत दागिन्यांची लूट

मंगळसुत्र चोरी

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

रात्रीच्या वेळी विहिरीवरील लाइट सुरू करण्यासाठी गेलेल्या ७७ वर्षांच्या महिलेवर अज्ञात चोरट्यांनी हल्ला करीत महिलेचे ५२ हजार रुपये किमतीचे दागिने लुटून अंधारात पळ काढला. ही घटना तालुक्यातील मालसाने गावच्या शिवारात घडली. हल्ल्यात वयोवृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत वडनेर भैरव पोलिसांत फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सखुबाई चंदर शिंदे (७७) असे या महिलेचे नाव आहे. त्या विहिरीवर गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी पाठीमागच्या बाजूने त्यांच्या डोक्यात लाकडाने वार केला. यामुळे सखुबाई खाली पडल्या. चोरट्याने त्यांच्या अंगावरील एकूण ५२ हजार रुपयांचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लुटून पोबारा केला. त्यांनी आरडाओरडा केल्यावर घरच्यांनी धाव घेत त्यांना दवाखान्यात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच मनमाडचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, वडनेर भैरवचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलिस उपनिरीक्षक पी. व्ही. तागड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

हेही वाचा:

The post नाशिक : वयोवृद्ध महिलेवर हल्ला करीत दागिन्यांची लूट appeared first on पुढारी.