नाशिक : वरवंडी येथे गायींची वाहतुक करणारा ट्रक पकडला

गायींची वाहतुक करणारा ट्रक पकडला,www.pudhari.news

देवळा (जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा 

वरवंडी ता. देवळा येथे आज मंगळवारी (दि. ८) दुपारी १ वाजता देवळाच्या दिशेने जात असलेला गायींनी भरलेला ट्रक पकडून देवळा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला.

आज दुपारी १ वाजेच्या सुमारास रवळजी ता. कळवण येथून देवळ्याच्या दिशेने गायी भरून येत असलेला ट्रक (क्रमांक एम एच १८ इ ७६०९ ) वरवंडी ता. देवळा येथे नागरिकांनी अडवला. या घटनेची देवळा पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, पोलीस नाईक विनय देवरे आदींनी घटनास्थळी दाखल होऊन ट्रक पुढील कार्यवाही साठी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

यावेळी ट्रक मधील गायी या गो शाळेत नेत असल्याचे व रवळजी ग्रामपंचायतीने तशी परवानगी दिली असल्याचे पत्र यावेळी संबंधितांनी सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना दिले. याबाबत ग्रामपंचायतीला गायींची अवैद्य वाहतूक करण्याची परवानगी देता येते का आदी संपूर्ण माहिती घेऊन व चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पाटील यांनी यावेळी दिली. चौकशीत कत्तलीसाठी नेत असल्याचे निष्पन्न झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल.

हेही वाचा : 

The post नाशिक : वरवंडी येथे गायींची वाहतुक करणारा ट्रक पकडला appeared first on पुढारी.