नाशिक : वलखेड फाट्यावर बर्निग कारचा थरार

बर्निंग कार,www.pudhari,news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाट्यावर सकाळी 10 वाजेच्या सुमारास बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. पिंपरखेड येथील बळीराम घडवजे यांच्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली.

वायरिंग शॉर्टसर्किट झाल्यामूळे इंडिका विस्टा एमएच 12 एफएन O745 या गाडीने भर रस्त्यात अचानक पेट घेतला. यावेळी गाडीमध्ये चालक बळीराम घडवजे हे एकटे होते. गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच ते गाडीच्या बाहेर पडले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा :

The post नाशिक : वलखेड फाट्यावर बर्निग कारचा थरार appeared first on पुढारी.