नाशिक : वसाकाचा ३७ वा गाळप हंगाम प्रारंभ उत्साहात

devla vasaka www.pudhari.news

नाशिक (देवळा): पुढारी वृत्तसेवा

धाराशिव संचलित वसाकाचा ३७ वा गाळप हंगामाचा सुभारंभ डी व्ही पी उद्योग समुहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अवसायक राजेंद्र देशमुख हे होते. विठे्वाडी येथिल धाराशिव संचलित वसाका युनिट नंबर दोन या कारखान्याचा गळीत हंगाम सुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला.

प्रमुख पाहुणे म्हणून कारखान्याचे अवसायक राजेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक अमर पाटील, जेष्ठ संचालक संजय खरात, संदीप खारे,अभासाहेब खारे,क्रुष्णा पाटील आदी उपस्थितीत होते. यावेळी योगेश शेवाळे व सुनिल तुपे, यांच्या शुभहस्ते सपत्नीक काटा तसेच गव्हान पुजन करण्यात आले.

अभिजित पाटील यांनी यांनी उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व वाहतुक ठेकेदारांसमोर बोलताना सांगितले की, कामगारांच्या थकित देण्यासंदर्भात राममंदिरात झालेल्या चर्चेनंतर कामगार संघटना व आमच्यात सामंजस्य करार करण्यात आला. करारासाठी उशीर झाल्याने एक वर्ष वाया गेले. परंतु उशिरा का होईना यशस्वी सामंजस्य करार झाला. अपेक्षित गाळप होत नसल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला देण्यात थोडे फार कमी अधिक होत असले तरी भविष्यात वसाका कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करु, त्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. कराराप्रमाणे कामगारांचे थकित देणी देण्यास मी कटीबद्ध आहे, त्यासाठी किमान चार लाख टन उस गाळप अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्याचे अवसायक राजेन्द्र देशमुख म्हणाले की, कामगार संघटनेशी झालेल्या त्रिपक्षीय कराराप्रमाणे कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी स्वतः कायमच आग्रही भूमिका मांडत आलो आहे. कारखान्याचे सरव्यवस्थापक कापडणीस यांनी प्रास्ताविक केले, वसाका मजदुर यूनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, विलास सोनवणे,दिपक पवार यांनी कामगारांच्या समस्या पोटतिडकीने मांडल्या. सेवानिवृत्त कामगारांची भविष्य निर्वाह निधी व ग्रजव्युटी देण्यात यावी, तसेच एकरकमी २५०० एफ आर पी, उस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात यावी, तसेच धाराशिव संचलित वसाकाच्या व्यवस्थापक मंडळाने कार्यक्षेत्रात ऊस दौरा आयोजित करावा, अशी आग्रही मागणी वसाका मजदुर यूनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांनी केली.

यावेळी विठेवाडी येथिल उस उत्पादक शेतकरी रावसाहेब निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु शिरसाठ,लक्ष्मन निकम,पिंटु निकम, माणिक निकम यांच्या सह्यांचे एक रकमी एफ आर पी संदर्भाचे निवेदन देण्यात आले . सूत्रसंचालन कुबेर जाधव यांनी केले तर आभार कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला कारखान्याचे तांत्रिक अधिकारी देसाई, उत्तपादन विभाग प्रमुख सुर्यवंशी, सह विज निर्मिती प्रमुख संतोष कचोर, मुख्य लेखापाल कोर, मुख्य शेतकी अधिकारी पटेल, साळुंखे,भिवराज सोनवणे, कार्यालय अधीक्षक शेवाळे, बाळासाहेब पवार, रविंद्र सावकार, अरुण सोनवणे,आंनदा देवरे, बापु देशमुख,मुन्ना पवार सुरक्षा अधिकारी बागुल आदीसह शेकडो कर्मचारी व अधिकारी, सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारखान्याचे माजी अध्यक्ष, तथा माजी आमदार शांताराम तात्या आहेर,व शशीकांत पवार, शेतकरी संघटनेचे नेते माधवराव मोरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

हेही वाचा:

The post नाशिक : वसाकाचा ३७ वा गाळप हंगाम प्रारंभ उत्साहात appeared first on पुढारी.