नाशिक: वांगण येथील शेतकऱ्याचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू

सुरगाणा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वांगण (सु) येथील शेतकरी देवराम काशिराम भुसारे (वय ४२) यांचा मृतदेह वांगण (सु) येथील भोवची चोंड नदीच्या पुराच्या पाण्यात आढळून आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवराम काशिराम भुसारे शेतातील घरी जाऊन येतो, असे सांगून घरातून निघून गेले होते. सायंकाळी न परतल्याने गावात, नातेवाईक यांच्याकडे त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कुठेही आढळून आले नाहीत. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. दरम्यान, त्यांचा मृतदेह भोवची चोंड नदीच्या काठावर आढळून आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

तलाठी जितेंद्र भोंडवे, पोलीस हवालदार दिलिप वाघ, ग्रामसेवक गावित यांनी पंचनामा केला. पोलीस पाटील परशराम चौधरी, नानाजी राऊत, चंद्रकांत टोपले, यशवंत भुसारे, विनायक भोये, विनोद भुसारे, देवाजी टोपले, मोहन चौधरी आदी उपस्थित होते. देवराम यांच्या आकस्मित मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा 

The post नाशिक: वांगण येथील शेतकऱ्याचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू appeared first on पुढारी.