नाशिक: वाखारी शिवारातील हॉटेलवर छापा टाकून देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश

prostitution business

नांदगाव: पुढारी वृत्तसेवा : नांदगाव – मालेगाव रस्त्यावरील वाखारी शिवारातील एका हॉटेलमध्ये सुरु असलेला देहविक्री व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. ही कारवाई शनिवारी (दि.२८) रात्री केली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण आणि नांदगाव पोलीस ठाणे यांनी ही संयुक्त कारवाई केली. बनावट गिर्‍हाईक पाठवत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

या कारवाईत मोहमद अख्तर सोनावाला, सचिन इंगळे, ज्ञानेश्वर मोरे, संदीप जाधव, वाल्मिक माळी, संजय मेनगर यांच्यावर  नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे.

काही महिन्यांपूर्वीच या हॉटेलवर धाड टाकत हॉटेल मालकासह  तरुण- तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते. पुन्हा असा प्रकार घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा 

The post नाशिक: वाखारी शिवारातील हॉटेलवर छापा टाकून देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश appeared first on पुढारी.