
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या चार दिवसांपासून वातावरणामध्ये उकाडा जाणवत असून त्यासोबतच सर्दी-पडशासारख्या साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. या आजारांमुळे नाशिककर जाम झाले आहेत.
चालू महिन्यात हवामानाच्या लहरीपणाचा अनुभव शहरवासीय घेत आहेत. डिसेंबरच्या पहिल्या १० दिवसांमध्ये पाऱ्यात झालेल्या लक्षणीय घसरणीने जनतेला हुडहुडी भरली. बंगालच्या उपसागरातील कमीदाबाच्या पट्ट्यामुळे गत आठवड्यात अवकाळी पावसाने एन्ट्री केली, तर सध्या प्रचंड उकाडा जाणवत असून, नागरिकांना घामाच्या धारा लागल्या आहेत. वातावरणातील या सततच्या बदलाने घरोघरी सर्दी-पडसे-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे दवाखानेदेखील हाउसफुल्ल होत आहेत.
वातावरणातील हा बदल पुढील काही दिवस कायम राहणार आहे. तसेच २५ डिसेंबरनंतर थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे हवामानातील हा बदल बघता नागरिकांनी काळजी घ्यावी. शक्यतो थंड पदार्थ खाणे टाळावे तसेच सर्दी-पडसे असल्यास कोमट पाणी प्यावे, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
हेही वाचा :
- नाशिक : ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान, उद्या निकाल
- तळेगाव ढमढेरे : पंचायत समितीच्या सदस्यावर फसवणुकीचा गुन्हा
- पुणे : वन विभाग परीक्षा ऑनलाईनच
The post नाशिक : वातावरणातील सततच्या बदलाने आजार वाढले appeared first on पुढारी.