नाशिक : वाद सोडवणार्‍यास झाली मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मारहाण करणार्‍यांच्या तावडीतून मित्राला सोडवणार्‍यास चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना भारतनगर येथील सप्तशृंगी देवी मंदिराजवळ घडली. या मारहाणीत रिजवान हनिफ शेख (24, रा. भारतनगर) हा जखमी झाला आहे. रिजवान याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघे मिळून रविवारी (दि.15) सायंकाळी हुजेफ सलीम खान यास मारहाण करत होते. त्यामुळे रिजवान याने मध्यस्थी केली असता चौघांनी मिळून रिजवान यास दगड, टोकदार वस्तूने मारहाण करीत दुखापत केली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

 

The post नाशिक : वाद सोडवणार्‍यास झाली मारहाण appeared first on पुढारी.