नाशिक : वाळू लिलावासंदर्भात आज विठेवाडीत शेतकर्‍यांची बैठक

वाळू

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

वाळू लिलावासंदर्भात तालुक्यातील विठेवाडी, भऊर, सावकी व खामखेडा येथील शेतकरी आणि ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी (दि. 10) आयोजित करण्यात आली आहे. शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार गिरणा नदीपात्रातील विठेवाडी, भऊर, सावकी व खामखेडा या गावाच्या नदीकाठावरील गिरणा नदीतून वाळू उपसा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यास येथील ग्रामस्थांनी अनेकदा सामुदायिक विरोध दर्शवला आहे. तसा ठरावही अनेक वेळा संमत करून शासनाला कळविण्यातही आले आहे. या गोष्टीची दखल घेत चांदवड-देवळाचे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख हे वरील चारही गावांतील ग्रामस्थांची भूमिका जाणून घेण्यासाठी बुधवारी (दि.10) विठेवाडी गावात बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : वाळू लिलावासंदर्भात आज विठेवाडीत शेतकर्‍यांची बैठक appeared first on पुढारी.