नाशिक : वाहतुकीसह अपघातांस निमंत्रण देणारा ट्रान्स्फाॅर्मर स्थलांतरित

सिडको www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सिडकोत वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा आणि अपघातांस निमंत्रण देणारा डॉ. हेडगेवारनगर (त्रिमूर्ती चौक) येथील विद्युत ट्रान्स्फाॅर्मर अन्यत्र स्थलांतरित झाल्याने सिडकोवासीयांनी सुटकेचा निःश्वास घेतला.

भररस्त्यात असलेले आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे हेडगेवार चौकातील ट्रान्स्फाॅर्मर अन्यत्र हलवावे यासाठी प्रयत्न करा, असे साकडे परिसरातील नागरिकांनी सुधाकर बडगुजर यांना घातले होते. बडगुजर यांनी तातडीने विद्युत मंडळाच्या तसेच अन्य यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा ट्रान्स्फाॅर्मर सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्यत्र हलविण्याची विनंती केली असता हा प्रश्न मार्गी लागला. यामुळे आता त्रिमूर्ती चौक परिसरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित झाली आहे. बडगुजर यांनी नंतर समक्ष पाहणी करून या परिसरातील वाहतुकीचा आढावाही घेतला.

हेही वाचा:

The post नाशिक : वाहतुकीसह अपघातांस निमंत्रण देणारा ट्रान्स्फाॅर्मर स्थलांतरित appeared first on पुढारी.