नाशिक : विंचूरला वीजचोरांना दहा लाखांचा दंड

वीजचोरी www.pudhari.news

विंचूर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

महावितरणने वीजचोरीला आळा घालण्यासाठी विंचूर उपविभागात राबविलेल्या धडक कारवाईत १८ वीजचोरांना शोधून काढले. या वीजचोरांना दहा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सुमारे ३६ हजार युनिटची वीजचोरी पकडली असून, एका दिवसात पकडण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.

विजेचा वाढता वापर परंतु कमी येणारे बिल यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी विंचूर उपविभागात शोधमोहीम राबविण्यात आली. यासाठी सहायक अभियंता किरण काकड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने विंचूरमध्ये केलेल्या कारवाईत १८ वीजचोरांना शोधून काढले. या आकडेबहाद्दरांनी ३६ हजार वीज युनिटची चोरी केल्याचे तपासात उघड झाले. त्यासाठी त्यांना दहा लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यापैकी सुमारे पावणेसहा लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दंड न भरणाऱ्या ग्राहकांविरोआधात भारतीय विद्युत कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती काकड यांनी दिली. मीटरमध्ये फेरफार करणे, आकडा टाकून वीज शेगडी वापरणे अशा विविध क्लृप्त्या करून ग्राहकांनी वीजचोरी केल्याचे उघड झाले.

विंचूर उपविभागात वीजचोरांना पकडण्याचे सत्र सुरूच राहील. ग्राहकांनी नियमित वीजबिल भरावे व वीजचोरी करू नये.

– किरण काकड, सहा. अभियंता-विंचूर

हेही वाचा :

The post नाशिक : विंचूरला वीजचोरांना दहा लाखांचा दंड appeared first on पुढारी.