देवळा; पुढारी वृत्तसेवा : इस्राईलच्या युद्धामुळे विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावाने 62 हजाराची उच्चांकी गाढली परंतु देवळा शहरात विजया दशमीसाठी विक्रीस आलेल्या पिवळ्या सोन्याला (झेंडू) मातीमोल किंमत आल्याने सायंकाळी झेंडूची फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.
देवळा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने कुठलीही पिके आली नाहीत त्यामुळे कमी पावसात येणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली फुलांच्या माध्यमातून दिवाळी गोड व्हावी अशी अपेक्षा ठेऊन बऱ्या पैकी आलेल्या फुल शेतीला फुले घेऊन नवरात्रात व विजया दशमीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणला परंतु खरेदी दारांनी पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनाबरोबच विकत फुले घेऊ न विक्री करणाऱ्या विक्रेत्याला देखील घेतलेल्या भावापेक्षा निम्म्याहून कमी भावात माल विकत असतांना देखील विक्री न झाल्याने सायंकाळी फुले फेकून द्यावी लागली.
मंगळवारी (दि. २४) देवळा शहरात कळवण तालुक्यातील अभोना, कानाशी ,चॅनकापूर या आदिवासी पट्टया तुन गोरगरीब आदिवासी बांधव फुल विक्रीसाठी देवळा येथे आले असता माल विक्री न झाल्याने त्यांचे जागा व गाडी भाडे वसूल न झाल्याची खंत या आदिवासी बांधवानी केली. १०० रुपये किलो जाणारी फुले १० रुपये किलो विकून देखील घ्यायाला कोणी तयार नाही .आधीच दुष्काळ त्यात अशी परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांनी करावे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला.
याबाबत नगरपंचायतीने जागा भाड्या मध्ये सवलत द्यायाला पाहिजे होती अशी प्रतिक्रिया कळवण तालुक्यातील मोहमुख येथील आदिवाशी महिला इंदूबाई पवार यांनी व्यक्त केली.
The post नाशिक : विजयादशमीसाठी विक्रीस आलेल्या झेंडू फुलांना कवडीमोलाचा दर appeared first on पुढारी.