नाशिक : इमारतीवर काम करत असताना वीजेचा धक्का लागून त्यानंतर सातव्या मजल्यावरून खाली पडल्याने २५ वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. भीमा नवसु दगडे (रा. बिलवंडी, ता. दिंडोरी) असे या मजुराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमा हा कॅप्टन पेट्रोल पंपाजवळील एका निर्माणाधीन इमारतीवर काम करत होता. रविवारी (दि. २४) दुपारच्या सुमारास काम करत असताना भीमाला वीजेचा धक्का बसला. त्यामुळे तो जोरात फेकला गेल्याने तो इमारतीच्या सातव्या मजल्यावरून खाली पडला. वीजेचा धक्का व उंचावरून पडल्याने भीमा यास गंभीर दुखापती झाल्या होत्या. त्यामुळे त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच भीमाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- पुणे :नवी खडकीत तरुणावर हल्ला, गुन्हा दाखल
- विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त विभागांत ओला दुष्काळ जाहीर करा : अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- पिंपळे गुरव : जिजामाता उद्यानासमोर पदपथालगत दारूच्या बाटल्या
The post नाशिक : विजेचा धक्का लागून उंचावरुन पडल्याने मजूराचा मृत्यू appeared first on पुढारी.