नाशिक : विजेच्या धक्क्याने डीजेचालकाचा मृत्यू

मृत्यू,

नाशिक, पंचवटी : दांडिया महोत्सवानंतर डीजेची आवरसावर करताना विजेचा धक्का लागल्याने डीजेचालकाचा मृत्यू झाला आहे. पप्पू अरुण बेंडकुळे (35, रा. आडगाव) असे या डीजेचालकाचे नाव आहे. आडगाव परिसरात मंगळवारी (दि. 4) रात्री ही घटना घडली.

आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडगाव येथे मंगळवारी (दि. 4) रात्री दांडिया संपल्यानंतर पप्पू त्याच्या मित्रासह टेम्पोत सामान ठेवत असताना तेथील शिडीत वीजप्रवाह उतरला होता. पप्पूने चप्पल घातलेली नसल्याने त्याने शिडीस हात लावल्यानंतर त्याला विजेचा धक्का बसला व त्याचा मृत्यू झाला. त्याआधी पप्पूचा मित्रही टेम्पोत चढला होता. मात्र, त्याच्या पायात चप्पल असल्याने तो बचावला.

हेही वाचा :

The post नाशिक : विजेच्या धक्क्याने डीजेचालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.