Site icon

नाशिक : विज्ञान प्रदर्शनात आदिवासी विद्यार्थ्यांचा आविष्कार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी विकास विभागाच्या मोहनदरी येथील शाळेत प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात आदिवासी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट आविष्कार सादर करत उपस्थितांचे मने जिंकली. या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करत अतिशय कमी साधनसामग्रीत विविध प्रकल्प बनविले आहे. त्यामुळे हे प्रकल्प चर्चेचा विषय ठरत आहे.

विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी अपर आयुक्त संदीप गोलाईत, कळवण प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे, सहायक प्रकल्प अधिकारी आर. आर. पाटील, मुख्याध्यापक अनिल अहिरे आदी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनामुळे समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा, वैद्यकीय ज्ञानावर आधारित उपकरणे साधने यांचा दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारा अभाव यावर सविस्तर विवेचन करून आश्रमशाळा विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबाबत रुची व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल, असा आशावाद प्रकल्प अधिकारी नरवाडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, विज्ञान प्रदर्शनात लहान व मोठ्या गटात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ आलेल्या विद्यार्थ्यांचा अधिकार्‍यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कारासह सुपर 50 या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचादेखील सत्कार करण्यात आला. विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी वाय. इ. बागूल, दिलीप पाटील, राहुल बोणदार, विजय खवासे आदींनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून विज्ञाननिष्ठ राहावे. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे. समाजाला, पर्यायाने राष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कटिबद्ध राहावे. – संदीप गोलाईत, अपर आयुक्त, नाशिक.

हेही वाचा:

The post नाशिक : विज्ञान प्रदर्शनात आदिवासी विद्यार्थ्यांचा आविष्कार appeared first on पुढारी.

Exit mobile version