नाशिक : विज कोसळल्याने शेतकरी मृत्यूमुखी तर पशुधनाचेही नुकसान

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील तांदुळवाडी येथे सोमवारी (दि.१३) रात्री शेतातून काढलेले कांदे झाकण्यासाठी गेलेले शेतकरी नाना गमन चव्हाण (६०) यांच्या अंगावर विज पडून ते जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तर तालुक्यातील हिरेनगर येथे नारायण नामदेव बिन्नर या शेतकऱ्यांच्या दोन म्हशी विजपूडून दगवल्याची तर मोरझर येथील शेतकरी कैलास सुर्यभान चोळके यांच्या शेतातील निंबाच्या झाडावर विज पडल्याची घटना घडली आहे.

सोमवारी (दि.१३) ला रात्री अचानक वातावरणात बदल होत पावसाला सुरुवात झाली. तांदूळवाडी येथे शेतात काढलेले कांदे झाकण्यासाठी नाना चव्हाण हे तांदूवाडीचे उपसरपंच सुदाम काळे यांच्या दुचाकीवर शेतात गेले. शेतात गेल्यावर काही वेळातच विजेचा कडकडाट सुरू झाला असता नाना चव्हाण कांदे झाकत असताना त्यांच्यावर अचानक वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. उपसरपंच यांच्या डोळ्यासमोर घटना घडल्याने त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी त्वरित चव्हाण कुटुंबियाना कळविले. सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी अमित उगले, पोलीस पाटील,सरपंच यांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : विज कोसळल्याने शेतकरी मृत्यूमुखी तर पशुधनाचेही नुकसान appeared first on पुढारी.