नाशिक : विद्यार्थिनींच्या वर्गासमोर तरुणाचे अश्लील कृत्य

अटक,www.pudhari.news

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
श्रमिकनगर कार्बन नाका येथील महापालिकेच्या श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात 8 वीच्या विद्यार्थिनींसमोर वर्गाबाहेरून एका तरुणाने शुक्रवारी (दि.29) सायंकाळी साडेचारच्या दरम्यान अश्लील कृत्य करत छेडछाडीचा प्रकार घडला.

युवकाच्या या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी तत्काळ शिक्षकांकडे तक्रार केली. संशयितास शालेय आवारातून पकडून चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संतोष इंगळे असे संशयिताचे नाव असून, तो अशोकनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करतो. या प्रकारामुळे शालेय सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. श्रमिकनगर शाळेत शिक्षक वर्ग व कर्मचारी संख्येचा अभाव आहे.

पाच एकर शाळेच्या परिसरात अवघे दोनच सुरक्षारक्षक आहे. त्यामुळे शाळेत सुरक्षारक्षक व पूर्ण क्षमतेने शिक्षकांची नियुक्ती करावी. तसेच अशा टवाळखोरांवर कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : विद्यार्थिनींच्या वर्गासमोर तरुणाचे अश्लील कृत्य appeared first on पुढारी.