नाशिक : विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक निलंबित

नाशिक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सिडकोत एका माध्यमिक विद्यालयात पीटी विषय शिकविणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी नवीन नाशिक सामाजिक कट्टा ग्रुपच्या सदस्यांनी शाळा व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे संबंधित शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली होती. यावेळी व्यवस्थापनाने संबंधित शिक्षकावर न्यायालयाचा आदेश येईपर्यंत निलंबनाची कारवाई केल्याची माहिती प्रशांत जाधव यांनी दिली.

ग्रुपचे सदस्य प्रशांत जाधव, अजिंक्य गिते, देवेंद्र पाटील, राजेंद्र मराठे, कैलास खांडगे, महेश चव्हाण, समाधान ठोके, संदीप पवार, शशिकांत गरुड आदींसह सभासद उपस्थित होते.

पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिडकोतील एका माध्यमिक विद्यालयात ६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ही घटना घडली. पीटी विषयाच्या शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत जवळीक साधत तिच्यासोबत गैरवर्तन केले. विद्यार्थिनीने घरी जाऊन ही सर्व बाब पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी अंबड पोलिस ठाण्यात धाव घेतली व गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा :

The post नाशिक : विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक निलंबित appeared first on पुढारी.