
संगमनेर : भरधाव वेगाने पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील शाळेच्या सहलीची बस पुणे- नाशिक महा मार्गावरील रायतेवाडी फाटा परिसरातील गतिरोधकावर आदळून झालेल्या अपघातात सात विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली.
कवडदरा येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची सहलीची बस नाशिककडे येत असताना रायतेवाडी फाट्याजवळील गतिरोधक रात्रीच्या वेळी चालकाच्या लक्षात आला नाही त्यामुळे बस जोरदार आदलळी. माहिती कळताच संगमनेर शहर पोलिसांनी धाव घेत जखमी विद्यार्थी संदिप कोरडे, रोशन चौरे, जय टोचे, तेजस फोकणे आदित्य झनकर, सुरज म्हस्के, रोशन शिंदे यांना उपचारार्थ घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा :
- नाशिकमध्ये रस्ता चोरीला गेलाय, या रस्त्यासाठी अण्णा हजारे यांना साकडे…
- ब्राम्हणीत जनावरांचे मृत्यू थांबता-थांबेना! पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला चावा
- देशातील १३ टक्के तरुणांची लठ्ठपणाशी झुंज!
The post नाशिक : विद्यार्थ्यांच्या बसला अपघात, सातजण जखमी appeared first on पुढारी.