
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या विषयात काही सूचना करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष तथा दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे सदस्य नरहरी झिरवाळ थेट जिल्हा परिषदेत दाखल झाले. यावेळी त्यांच्या सोबत त्र्यंबक-इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे सदस्य हिरामण खोसकर देखील होते.
यावेळी आ. झिरवाळ यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम १ आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या दालनात बैठक घेत पाणीपुरवठा योजनेच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली. याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देत यातून कसा मार्ग काढता येईल याबाबत मार्गदर्शनदेखील केले. याबाबत सीईओ मित्तल यांना विचारले असता त्यांनी आमदारांचे काही प्रश्न असल्याने त्यांनी आज भेट दिली असल्याचे सांगितले.
झिरवाळ यांनी ओढले ताशेरे
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्हा परिषदेत येऊन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांची हजेरी घेतली. जलजीवन मिशन योजनांच्या कामांसह बांधकाम विभागाकडून झालेल्या काम वाटपावरून सोनवणे यांची कानउघडणी केली. आधी पाईपलाईन मग पाण्याचे स्त्रोत कसे तपासतात ?, विहिरी कोरडया असताना पाणी पुरवठा योजना कशी होते ?, एका-एका ठेकेदाराला 10 ते 15 कामांचे वाटप ?, नियमात नसताना सब-ठेकेदार का? अशा प्रश्नांची सरबत्ती केली.
हेही वाचा :
- पिंपरी : नोकरीचे आमिष दाखवून 13 लाखांची फसवणूक
- मुंबई : मालाड रेल्वे स्थानका लगतच्या रस्ता रूंदीकरणासाठी मनपाकडून तोडक कारवाई
- Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडे सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी दाखल
The post नाशिक : विधानसभा उपाध्यक्ष थेट मिनी मंत्रालयात appeared first on पुढारी.