Site icon

नाशिक विभागातील २ लाख ६२ हजार पदवीधर ठरविणार आमदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे.

विभागात एकून २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली.

विभागात सर्वाधिक मतदार नगर जिल्ह्यात असून तेथे १ लाख १५ हजार ६३८ मतदारांची नोंदणी झाली आहे. नाशिकमध्ये ६९ हजार ६५२, जळगावला ३५ हजार ५८, धुळ्यात २३ हजार ४१२ तर नंदूरबारमध्ये १८९७१ इतके मतदार आहेत. तसेच विभागात ३३८ मतदान केंद्रांवर ३० जानेवारीला मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. त्यासाठी ३३८ मतदान केंद्र अंतिम करण्यात आली आहे. त्यात नगरला १४७ केंद्र असून नाशिकमध्ये ९९, जळगावला ४०, धुळ्यात २९ आणि नंदूरबार २३ मतदान केंद्रे आहेत. दरम्यान, विभागीय आयुक्त स्तरावरून पुढील तीन दिवसांत मतपत्रिका छपाई करून विभागातील पाचही जिल्ह्यात तीचे वितरण केले जाईल, अशी माहिती मिळते आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक विभागातील २ लाख ६२ हजार पदवीधर ठरविणार आमदार appeared first on पुढारी.

Exit mobile version