नाशिक विभागात आठ कारागृहांचे कामकाज

नाशिक मध्यवर्ती कारागृह www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; राज्य कारागृह विभागांतर्गत असलेल्या मध्य विभागातील छत्रपती संभाजीनगर या प्रादेशिक कार्यालयाचे विभाजन करुन नाशिक विभागाचा कार्यभार स्वतंत्र करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. गृह विभागाने यासंदर्भात शासन आदेश काढला आहे. त्यानुसार नाशिक विभागाकरीता पुणे कारागृह मुख्यालयातील उपमहानिरीक्षक (डीआयजी) दर्जाचे अधिकारी नियुक्त होणार आहेत. नाशिक कार्यालयांतर्गत आठ कारागृहांचे कामकाज होणार आहे.

महाराष्ट्र कारागृह विभागात मुख्यालय व्यतिरिक्त चार विभाग कार्यरत आहेत. त्यानुसार पश्चिम (येरवडा) विभागात १२, पूर्व (नागपूर) विभागात १६, दक्षिण (मुंबई) विभागात १४ आणि मध्य (छत्रपती संभाजीनगर) विभागात १८ कारागृहे आहेत. कामकाजाच्या सोयीसाठी मध्य विभागाचे विभाजन करुन नाशिक प्रादेशिक विभाग स्वतंत्र करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये स्वतंत्र कारागृह उपमहानिरीक्षक दर्जाचे अधिकारी लवकरच नियुक्त होणार आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली आठ कारागृहांचे कामकाज नाशिक विभागातून होईल. नाशिकमध्ये त्यांचे कार्यालय व पदनिर्मितीसंदर्भात गृह विभागाने आदेश दिले आहेत.

नाशिक प्रादेशिक विभागातंर्गत कारागृहे

१. नाशिकरोड मध्यवर्ती व खुले कारागृह

२. धुळे जिल्हा कारागृह

३. नंदूरबार जिल्हा कारागृह

४. जळगाव जिल्हा कारागृह

५. भुसावळ जिल्हा कारागृह

६. अहमदनगर जिल्हा कारागृह

७. विसापूर खुले जिल्हा कारागृह

८. किशोर सुधारालय, नाशिक

पुणे येथील कारागृह उपमहानिरीक्षक हे पद आता नाशिक येथे होणाऱ्या स्वतंत्र प्रादेशिक कार्यालयासाठी वर्ग करण्यात आले आहे. या कार्यालयासाठी पदे वर्ग करण्यासही मान्यता देण्यात आल्याचे शासनाचे उपसचिव विनायक चव्हाण यांच्या आदेशाने देण्यात आले आहेत

असे असेल पदस्थापन

० कारागृह उपमहानिरीक्षक

० स्वीय सहायक (१)

० कार्यालयीन अधीक्षक (१)

० तुरुंगाधिकारी (२)

० पोलिस उपनिरीक्षक (१)

० वरिष्ठ लिपिक (२)

० लिपिक (५)

० कारागृह शिपाई (५)

० लघुलेखक (१)

० चपरासी (२)

एकूण २१

हेही वाचा :

The post नाशिक विभागात आठ कारागृहांचे कामकाज appeared first on पुढारी.