नाशिक विभागात भरणार ‘पर्यटन महोत्सव’! स्थानिक कलासंस्कृतीचा आस्वाद

नाशिक : राज्यात स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन आणि प्रादेशिक पर्यटन संचालनालयातर्फे पर्यटन महोत्सवाला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मार्चमध्ये नाशिक विभागात पर्यटन महोत्सव होईल. त्यामध्ये भंडारदरा, लळिंग किल्ला, नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्य आणि नाशिकमधील ग्रेप पार्क रिसॉर्टचा समावेश आहे. पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक नितीन मुंडावरे यांनी ही माहिती दिली. 

भंडारदरा, लळिंग, नांदूरमधमेश्‍वर अन नाशिकचा समावेश 
पर्यटन संचालनातर्फे होणारे महोत्सव असे : भंडारदरा (जि. नगर)-६ आणि ७ मार्च, धुळ्यातील लळिंग किल्ला-१४ मार्च, नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्य (जि. नाशिक)- २५ आणि २६ मार्च, नाशिकमधील ग्रेप पार्क रिसॉर्टमधील ग्रेप हार्वेस्टिंग महोत्सव- २७ आणि २८ मार्च. महोत्सवामध्ये स्थानिक शेतकरी आणि आदिवासींनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येईल. या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतील.

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

ट्रेकींग, विविध विषयावरील मार्गदर्शन व्याख्याने होतील. छायाचित्र आणि चित्रकला, किल्ला बनवण्याची स्पर्धा घेण्यात येतील. ऐतिहासिक पोवाडा आणि पर्यटनस्थळांची ‘टूर', फॅशन-शो, वाईन क्वीन स्पर्धा, पक्षी निरीक्षण, कृषी पर्यटनाबद्दल माहिती दिली जाईल. शेतीमालापासून विविध पदार्थ बनवले जातील. स्थानिक कलासंस्कृतीचा आस्वाद घेता येईल. खाद्यपदार्थ आणि हस्तकलांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री व्यवस्था असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी राहील, असेही श्री. मुंडावरे यांनी सांगितले. 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

पर्यटनासाठीचा संपर्क 
० दूरध्वनी क्रमांक ः ०२५३-२५७००५९ आणि २५७९३५२ 
० ई-मेल पत्ता ः ddtourism.nashik-mh@gov.in 
० संकेतस्थळ ः www.maharashtratourism.gov.in