नाशिक : विल्होळीत घरामध्ये साठविलेला दीड लाखाचा गुटखा जप्त

गुटखा जप्त,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विल्हाेळी शिवारातील भावनाथ गल्लीतील एका घरातून अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून दीड लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. अन्नसुरक्षा अधिकारी गोपाळ कासार यांना भावनाथ गल्लीतील शिवाजी भावनाथ यांच्या घरी गुटखा असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार छापा टाकून तपासणी केली असता घरात गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू असा १५ प्रकारचा साठा विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले.

जप्त गुटख्याची किंमत एक लाख ४३ हजार ८०० इतकी असून, ही कारवाई सहआयुक्त (अन्न) गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) विवेक पाटील, अन्नसुरक्षा अधिकारी योगेश देशमुख, वाहनचालक निवृत्ती साबळे यांनी केली. याबाबत नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : विल्होळीत घरामध्ये साठविलेला दीड लाखाचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.