नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर सात वर्षे बलात्कार

अत्याचार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर एकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. राहत्या घरी आणि मित्रांच्या घरी बोलावून घेत तसेच, बाहेरगावी घेवून जात संशयिताने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तरूणीवर तब्बल सात वर्षे बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात बलात्कारासह कुटूंबियांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखिल भावसार, मिना भावसार व गुलाब भावसार (रा. मॉडेल कॉलनी, जेलरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे निखील भावसार याच्याशी प्रेमसंबध होते. नोव्हेंबर २०१४ ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान संशयिताने विवाहाचे आमिष दाखवून पिडीतेवर वेळोवेळी बलात्कार केला. पिडीतेने विवाहाचा तगादा लावला असता त्याने लग्नास नकार दिल्याने पिडीतीने पोलिसांत धाव घेत संशयितासह त्याच्या कुटूंबियांवर गुन्हा दाखल केला आहे

The post नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर सात वर्षे बलात्कार appeared first on पुढारी.