नाशिक : विवाहानंतर तब्बल 12 वर्षांनी मिळाले कुटुंबाला पूर्णत्व

गरोदर माता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विवाहानंतर मूल न होणार्‍या कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत असलेल्या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमधील उपचाराने एका कुटुंबातील जोडप्याला लग्नानंतर तब्बल 12 वर्षांनी आई-बाबा होण्याचे सुख मिळणार आहे.

राहुल आणि भावना कुलकर्णी यांच्या विवाहला 12 वर्षे झाली. लग्नानंतर काही वर्षे वाट पाहून मूल होत नसल्याने या जोडप्याने वंध्यत्वावरील उपचारासाठी अनेक मोठ्या शहरांत उपचार घेतले होते. मात्र, आई-बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण होत नव्हते. अनेक ठिकाणच्या उपचारांनंतरही यश येत नसल्याने हे जोडपे निराश होत होते. काही दिवसांनंतर त्यांना डॉ. नरहरी मळगावकर यांच्या प्रोजेनेसिस हॉस्पिटलमधील उपचाराबद्दल आणि येथील ‘सक्सेस रेट’बद्दल माहिती समजली.

हे जोडपे लगेच कोविड काळ असूनही एप्रिलमध्ये उपचारांसाठी प्रोजेनेसिसमध्ये आले. डॉ. नरहरी मळगावकर व डॉ. सोनाली मळगावकर यांनी पहिल्याच भेटीत त्यांच्या समस्यांचे निदान करून वर्षभरात बाळ होईल, असा दिलासा दिला. पुढे कुलकर्णी दाम्पत्याला उपचार सुरू होण्याच्या पाचव्या महिन्यातच ‘गुड न्यूज’ मिळाली.

हेही वाचा :

The post नाशिक : विवाहानंतर तब्बल 12 वर्षांनी मिळाले कुटुंबाला पूर्णत्व appeared first on पुढारी.