
नाशिक : नाशिक मधील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांकडून ९ वी आणि १० वी इयत्तेत शिकणा- या मुलींना १० वी नंतर आपले करिअर काय असावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. रचना ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेमार्फत दरवर्षी अशा प्रकारे उपक्रम घेतला जातो. यावर्षी अनिषा ठक्कर(फॅशन डिझाईन), पुनम उपाध्याय(इव्हेंट मॅनेजमेंट) अंगुरी भंडारी(चार्टर्ड अकाउंटंट, सिंध्दी शाह(शैक्षणिक) पुजा पमनानी(डिजीटल मार्केटींग), निता वैद्य (अॅडव्हेचर्स अॅड टुर्स, डॉ. रिचा साळुखे(डमॅटोलॉजिस्ट), दुर्गा जाधव(कराटे व बॉडीबील्डिंग) सिद्धी अंबेकर(सोशल मीडिया), शरयु भालेराव (जाहिरात व व्हाईस आर्टीस्ट) क्षेत्रातील महिलांनी मुलींना करिअर विषयक मार्गदर्शन केले. प्रसंगी रचना ट्रस्ट तर्फे गायकवाड मॅडम यांनी देखील आपले विचार मांडले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. प्रिया पिचा / भुतडा यांनी केले व अभार प्रदर्शन अॅड. प्रदिप भुतडा यांनी केले.
फार्म स्टे अंतर्गत आदिवासी मुलींना मोफत शिक्षण
येथील रिव्हर क्रेस्ट स्टे अँग्रो टुरिझम सेंटर तर्फे येथील बोट क्लब गंगापूर धरणालगत फार्म स्टे प्रकल्प चालविला जातो आहे. त्या अर्तगत पर्यटकांना निसर्ग सौदर्याचा आनंद लुटता यावा यासाठी राहण्याची व विविध प्रकारचे खादय पदार्थ व जेवण अशी सेवा उपलब्ध करुन दिली जाते. अनाथ किंवा ज्या मुलींच्या पालकांची अर्थिक क्षमता नाही अशा दुर खेडयापाडयातील आदीवासी मुलींना रचना ट्रस्ट या संस्थेमार्फत मोफत शालेय शिक्षण व होस्टेलची सोय दिली जाते.
The post नाशिक : विविध क्षेत्रातील तज्ज्ञ महिलांकडून मुलींना करिअर मार्गदर्शन appeared first on पुढारी.