नाशिक : वीकएण्डला त्र्यंबकेश्वर दर्शनाचे तीनतेरा

त्र्यंबकेश्वर दर्शन,www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
दिवाळीची सुटी संपली, तरीदेखील वीकएण्डला दर्शनासाठी गर्दी होत आहे. पूर्व दरवाजा दर्शनबारीत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची रीघ लागल्याने चार ते पाच तास दर्शनासाठी रांगेत थांबावे लागत असून, दर्शन नियोजनाचा फज्जा उडाला आहे.

देवस्थान ट्रस्टने 200 रुपयांत थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध केली आहे. देवस्थान ट्रस्टला शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत किमान 20 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. त्यातही गर्दीच्या कारणाने काही वेळा तिकीट विक्री बंद ठेवण्याची वेळ येते. त्यामुळे तिकीट घेण्यासाठी मंदिरासमोरील चौकात किमान दोन तास उभे राहावे लागते. त्यामुळे फुकट अथवा विकत दोन्ही प्रकारच्या दर्शनाला किमान चार ते पास अवधी लागत आहे. पर्यटन वाढावे म्हणून शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. पर्यटनाच्या माध्यमातून येथे रोजगार उपलब्ध होईल, अशी शासनाची धारणा आहे. मात्र, आलेला भाविक वाहन उभे करण्यापासून ते दर्शन घेईपर्यंत थकून जातो. यासाठी त्याचे पाच ते सहा तास खर्ची पडतात.

सुविधा पुरविण्याचा नाहक भार :

येथे आल्यानंतर भाविकांना वाहनतळ ते मंदिर इतकाच परिसर माहीत होतो. त्यामुळे येथील रोजगारास या वाढलेल्या पर्यटनाचा विशेष फायदा होत नाही. मंदिरासमोर 200 रुपये तिकीट घेण्यासाठी रस्ता अडवणारी तुडुंब गर्दी, मंदिराच्या बाजूस रिंगरोडला लागलेल्या वाहनांनी वाहतुकीची कोंडी मात्र त्याच वेळी शहराच्या उर्वरित भागात शुकशुकाट असतो. येथील अर्थकारणास भाविक पर्यटकांचा हातभार लागत नाही. त्यामुळे शहरात झालेली गर्दी बिनकामाची असून, नगर परिषदेला त्यांना मूलभूत सुविधा पुरविताना नाहक भार सोसावा लागतो, अशी भावना निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : वीकएण्डला त्र्यंबकेश्वर दर्शनाचे तीनतेरा appeared first on पुढारी.