नाशिक : वीजपुरवठा खंडीत केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

थकीत वीजबिल न भरल्याने विजपुरवठा खंडीत केल्याचा राग आल्याने दोघांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना जुने नाशिक येथील दरबार रोडवरील सुलभ शौचालयाजवळ घडली. याप्रकरणी सचिन एकनाथ लिटे यांनी संशयित अजय पवार व लखन पवार (दोघे रा. दरबार रोड) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन लिटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि.१८) दुपारी १२.३० च्या सुमारास त्यांनी संशयित अजय पवार यास थकीत वीजबिलाबाबत विचारणा केली. त्यात वीज बिल भरलेले नसल्याचे आढळून आल्याने सचिन यांनी अजयच्या घराचा विजपुरवठा खंडीत केला. त्यानंतर सचिन तेथून जात असताना संशयितांनी संगनमत करून सचिन यांना दगड मारला. अजयने लोखंडी सळईने सचिनच्या डोक्यावर मारहाण करीत गंभीर दुखापत केली. त्याचप्रमाणे सचिन यांच्यासोबत वाद घालत सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : वीजपुरवठा खंडीत केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण appeared first on पुढारी.