
नाशिक : घरात इलेक्ट्रीक बोर्डमध्ये पिन लावत असताना विजेचा धक्का बसल्याने ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. सुनील विश्वनाथ आसवरे (रा. माडसांगवी) असे या युवकाचे नाव आहे. सुनील यांना बुधवारी (दि.१७) सायंकाळी सहाच्या सुमारास विजेचा धक्का बसला. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- हिंगोली : सेनगाव येथे चोरट्यांचा तीन लाख रुपयांच्या तूरडाळीवर डल्ला
- Krishna Janmashtami 2022: मथुरा ते गुरुवायूर ‘ही’ आहेत भारतातील प्रसिद्ध श्रीकृष्णाची मंदिरे
The post नाशिक : वीजेचा धक्का लागल्याने युवक ठार appeared first on पुढारी.