नाशिक : वीजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

file photo

नाशिक : सेंट्रीगचे काम करत असताना वीजेचा धक्का लागून ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेत हिरामण रामदास गोराळे (३७, रा. गोळाशी, इंदिरानगर) यांचा मृत्यू झाला. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.१४) दुपारी अडीचच्या सुमारास भावी नीरज एजन्सी मधील शोरुममध्ये सेंट्रीगचे काम करत असताना त्यास विजेचा धक्का बसला व त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

The post नाशिक : वीजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.