Site icon

नाशिक : वीज कर्मचारी तीन दिवस संपावर

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

विजेच्या खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंता, अधिकारी संघर्ष समिती, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन, भारतीय महिला फेडरेशन व कामगार एकता कमिटीच्या वतीने तीनदिवसीय संप पुकारण्यात आला असून दि. 4, 5, 6 जानेवारीला होणाऱ्या या संपात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिकरोड येथील कार्यालयाबाहेर झालेल्या द्वारसभेत करण्यात आले आहे.

वीज (दुरुस्ती) विधेयक २०२२ आणि समांतर परवान्याचे प्रस्ताव ग्राहकांच्या, कामगारांच्या व समाजहिताच्या विरोधात आहेत. वीज मूलभूत गरज आहे. पाणी आणि इतर गरजा ज्याप्रमाणे सर्वांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिल्या जातात, त्याचप्रमाणे वीजदेखील दिली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच (सुधारणा) विधेयक बिल मंजूर झाल्यास वीज क्षेत्राचे आणखी खासगीकरण होऊन वीज अधिक महाग होणार असल्याचा दावा संघटनांनी केला आहे.

संपात वर्कर्स फेडरेशन, स्वतंत्र बहुजन कर्मचारी संघटना, तांत्रिक संघटना, एस.ई.ए., बहुजन फोरम, कामगार महासंघ, कामगार सेना, ऑपरेटर संघटन आदी संघटना सहभागी होणार आहेत. या प्रसंगी विविध संघटनांच्या प्रतिनिधींसह पंडितराव कुमावत, महेश कदम, विनोद भालेराव, आर. जी. देवरे, सुधीर गोरे, ईश्वर गवळी, दीपक गांगुर्डे, दीपा मोगल, कांचन जाधव, जे. वाय. पांढरे, किरण जाधव. के. वाय. बागड, चंद्रकांत आहिरे, किरण मिठे, हर्षल काटे, सुनील पाटील, प्रशांत शेंडे, रितेश पिल्ले, राजेश बडनखे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : वीज कर्मचारी तीन दिवस संपावर appeared first on पुढारी.

Exit mobile version