नाशिक : वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पातील उत्पादनांचे ब्रॅण्डिंग करणार- मनपा आयुक्तांकडून पाहणी

नाशिक नवे मनपा आयुक्त,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शुक्रवारी (दि.5) वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पातील आरडीएफ, प्री सॉर्टिंग, मृत जनावरे विल्हेवाट, लिचट ट्रिटमेंट प्लॅन्ट, कंपोस्ट खत अशी विविध प्रकारची कामे आणि उत्पादने केली जात असल्याने त्याचे ब—ॅण्डिंग करण्याची गरज आयुक्तांनी व्यक्त करत तशा सूचना अधिकार्‍यांना केल्या.

पाहणी दौर्‍यात कार्यकारी अभियंता बी. जी. माळी यांनी प्रकल्प तसेच विविध उत्पादनाविषयी माहिती दिली. महिन्याला सुमारे 1,000 ते 1,200 टन खतनिर्मिती होत असलेला हा प्रकल्प नाशिकसाठी अभिमानास्पद आहे, असे सांगत आयुक्तांनी कौतुक केले. खत विक्रीबाबत काही सूचना त्यांनी केल्या. अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, सॉलिड वेस्ट टेक्नॉलॉजिस्ट संजय बोरसे, शाखा अभियंता सुनील खैरनार, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यावेळी उपस्थित होते.

सरकारकडून प्रकल्पाचे कौतुक
राज्य सरकार आणि केंद्राकडूनही नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाचे कौतुक झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नाशिक शहराचा क्रमांक उंचावण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा झाला आहे. या प्रकल्पात तयार होणा-या खताची हरित महासिटी कंपोस्ट (सेंद्रिय खत) या नावाने विक्री होते. सुका कचरा, ओला कचरा, मेलेली जनावरे, कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डिमोलेशन वेस्टही इथे आणले जाते. सध्या शहरातून जमा झालेल्या प्लास्टिकचे रिसायकलिंग प्रकल्पात होते. प्लास्टिकपासून ग्रॅन्युअल्स म्हणजेच बारीक दाणे बनवले जातात.

इतर कंपन्यांना ते देऊन त्यापासून पुनरुत्पादन केले जाते. तसेच याच प्रकल्पात सुक्या कच-यातून जमा झालेल्या प्लास्टिकमधून इंधननिर्मिती केली जाते. आरडीएफ सिमेंट उद्योगाला पुरवले जाते. झाड्यांच्या पाल्यापाचोळ्यापासून बि—केट्स तयार करण्यात येतात. विशेष म्हणजे तीन विद्यार्थी या प्रकल्पावर पीएच.डी. करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पातील उत्पादनांचे ब्रॅण्डिंग करणार- मनपा आयुक्तांकडून पाहणी appeared first on पुढारी.