
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुकणे धरण रॉ-वॉटर पंपिंग स्टेशनसाठी महावितरणच्या रेमंड सबस्टेशन (गोंदे) येथून 33 केव्ही वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. सबस्टेशनमधील दुरुस्तीसाठी 17 डिसेंबरला वीजपुरवठा बंद ठेवण्यात येईल, असे महावितरणने कळविले आहे. त्यामुळे मनपाच्या विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रातून सिडको व नाशिक पूर्वभागासाठी पाणीपुरवठा शक्य होणार नसल्याने शनिवारी (दि. 17) सिडकोतील प्रभाग क्र. 24,25,26,22 हा भाग व 27,28,29,31 या संपूर्ण प्रभागांचा तसेच नाशिक पूर्वमधील प्रभाग क्र.14,15,23,30 भागातील प्रभागात सकाळ व सायंकाळचा संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही.
हेही वाचा:
- सांगली : नळ पाणी पुरवठ्याचे होणार जिओ टॅगिंग
- सातगाव पाणीपुरवठा योजना बंद
- water purifire : तांब्याचा वापर करून भारतीय संशोधकांनी विकसित केले पाणी शुद्ध करणारे नवे उपकरण
The post नाशिक : शनिवारी 'या' प्रभागात पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.