Site icon

नाशिक : शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या मुकणे धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ के. व्ही. वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. या सबस्टेशनमधील विद्युतविषयक कामे करण्याकरिता वीज वितरण कंपनीमार्फत शनिवारी (दि.२०) वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या विल्होळी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणार नसल्याने शनिवारी (दि.२०) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

त्याचबरोबर गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथून शिवाजीनगर, बाराबंगला, पंचवटी, नीलगिरी बाग, गांधीनगर, नाशिकरोड येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करण्यात येतो. या जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ व वितरण व्यवस्थेतील आवश्यक दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असल्याने गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या गंगापूर धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन व मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा पाणीपुरवठा शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर रविवारी (दि.२१) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने येणार असल्याने, नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्यांकडून (यांत्रिकी) करण्यात आले आहे.

हेही वाचा :

 

The post नाशिक : शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.

Exit mobile version