नाशिक शहराचे तापमान चाळिशीकडे! पावसाची शक्यता वर्तविल्याने चिंता

नाशिक : राज्यातील काही भागांत हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. नाशिक शहरातही गुरुवारी (ता.८) दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली होती. गुरुवारी कमाल तापमान ३७.३, तर किमान २१.७ अंशावर नोंदविले गेले. 

नागरिकांना उन्हाचे चांगलेच चटके
शहरात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा तडाखा वाढला असून, तापमान चाळिशीकडे जात आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत. लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद असल्या तरी नागरिकांची बाजारपेठेतील गर्दी कमी झालेली नाही. बुधवारी ३८.४ तापमान अंशांपर्यंत गेले होते, तर किमान तापमान १९.८ अंश होते. गुरुवारी ढगाळ वातावरणामुळे एक अंशाने तापमानात घट झाली. तरी उष्णतेची तीव्रता कमी झालेली नाही.

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

पावसाची शक्यता वर्तविल्याने चिंता

तापमानात अचानक बदल झाल्याने आरोग्याच्या समस्यांमध्येही वाढ होऊ शकते. पंधरा दिवसापूर्वीही शहरात तुरळक पावसाने हजेरी लावली होती. गुरुवारी ढगाळ वातावरणामुळे आणि हवामान खात्याने राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तविल्याने चिंता वाढली आहे.  

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश