नाशिक : शहरातील अट्टल सायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात

सायकल चोर ताब्यात,www.pudhari.news

नाशिक, सिडको : अंबड एमआयडीसी पोलिसांनी दोन चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून विविध भागातून चोरी केलेल्या १ लाख ३४ हजार रुपये किंमतीच्या १२ सायकल जप्त करण्यात आल्या. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र लालमन सिंह (३८ रा. अंबड) याच्या घरासमोरून दि. २४ ऑक्टोबर रोजी सायकल चोरीला गेली होती.

याबाबतची तक्रार सिंह यांनी एमआयडीसी पोलीस चौकीत केली. पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल चोरट्यांचा तपास सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संजीवनगर भागात गुन्हे शोध पथकाने सापळा रचून दोन चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्या असता, त्यांनी अंबड तसेच सिडकोतील विविध भागातून सायकल चोरी केल्याची कबुली दिली. प्रतीक रवींद्र पाठक (२२ रा. निगळ संकुल, संजीवनगर) व मोहम्मद हुसेन अवसरअली खान (३८, रा. मारुती संकुल ) या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ लाख ३४ हजार रुपये किमतीच्या बारा सायकली पोलिसांनी जप्त केल्या आहे.

The post नाशिक : शहरातील अट्टल सायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.