नाशिक शहरातील उड्डाणपुलाखालील रस्त्यावर अपघातांची मालिका सुरुच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं दुर्लक्ष

नाशिक : नाशिकचे रस्ते आहेत की घसरगुंडी हा प्रश्न नाशिककरांना पडलाय. नाशिक शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुला खालील रस्ता पूर्णतः निसरडा झाला आहे. दर पाच मिनिटाला एक दुचाकीस्वार घसरून खाली पडतोय. रोज असंख्य वाहनचालक गंभीर जखमी होत आहेत. त्यामुळे नाशिककरांमध्ये संतापाची लाट उसळली असून एखाद्याचे प्राण जाण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

नाशिक-मुंबई महामार्ग नाशिक शहरातून जातो. या महामार्गाने शहराचे दोन भाग केलेत. याच महामार्गावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात 2012-13 साली उड्डाणपूल बांधून पूर्ण झाला. उड्डाणपूलाचे उद्घाटन झाले त्यानंतर अवघ्या दोन-अडीच तासात उड्डाणपुलावर दोघा वाहनचालकाचा अपघाती मृत्यू झाला. तेव्हापासून अपघाताची श्रुंखला आजतागायत थांबली नाही.

इंदिरानगर ते आडगाव नाका या दरम्यान ठिकठिकाणी वाहनचालक घसरून पडतायेत. दुचाकी चालवणे जिकरीचे बनलं असून एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. नाशिक-मुंबई महार्गावरील उड्डाणपुलाखालील हा मुख्य रस्ता आहे. थोडासा जरी पाऊस पडला तरी उड्डाणपुलावरील ऑईल  मिश्रित पाणी खाली पडते आणि  रस्त्यावरील मातीचा चिखल होऊन एकापाठोपाठ एक अशी धडाधड दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना जबर मार बसत असून गंभीर जखमी होत आहेत. अनेकांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्याची वेळ येत आहे.
पुलावरून मोठ मोठी वाहने जातात त्यांचे ऑइल रस्त्यावर पडते पाऊस झाल्यावर पाण्याबरोबर ऑईल ही खाली येते रस्ता निसरडा होऊन अपघातांच्या घटना घडत आहेत.

उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, पाईपलाईन तुटली आहे, उड्डाणपुला खालील रस्त्याच्या दुभाजकात शोभिवंत झाडी लावल्याने तिथली माती खाली येते आणि चिखल तयार होतो. दुभाजकाची उंची वाढवण्याची गरज आहे. काही ठिकाणी रस्त्याला वळण आहे तिथला रस्ता गुळगुळीत झालाय, याभागात  दरवर्षी हमखास अपघाताच्या घटना घडत आहेत. या समस्या लक्षात घेऊन त्यावर तातडीने काम करण्याऐवजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस प्रशासनाने वाहतुकीसाठी रस्ताच बंद केला.

रोगापेक्षा इलाज भयंकर असा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा कारभार आहे. जे नागरिक कर भारतात त्यांना सुविधा देण्या ऐवजी रस्ता बंद करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल उपस्थित होत आहे. आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ज्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली रस्ता झाला त्यांच्या पैशातून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केलीय. शहरातून रस्ता जात असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बरोबरच मनपाची ही जबाबदारी आहे.

मात्र या अपघाताची जबाबदारी कोणीच घेत नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनपा आणि पोलीस आयुक्तांना या रस्त्याची पाहणी करून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक पोलिसांनी नुकतीच नो हेल्मेट नो पेट्रोल ही मोहिम  सुरू केलीय. हेल्मेट नसेल तर पेट्रोल ही मिळत नाही शिवाय दंड ही भरावा लागतो. मात्र अपघाताला कारणीभूत असणाऱ्या विरोधात पोलीस  कारवाई करत नाही.

तर दुसरीकडे याच पुलाला जोडणाऱ्या नवीन मात्र अर्धवट बांधकाम झालेल्या पुलाचे उद्घाटन खासदारांनी केले आणि लोकप्रतिनिधींमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. मात्र यातील एकही लोकप्रतिनिधी अपघात होतात त्या स्पॉटवर जात नाही, अपघातग्रस्तांची विचारपूस करत नाही, त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासना विरोधात नागरिकांमध्ये रोष असून एखाद्याचे प्राण जाण्याआधी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.