नाशिक शहरात आणखी १४ ठिकाणी बाराशे रुपयांत ‘रेमडेसिव्हिर’; विक्रेत्यांचा सकारात्मक प्रतिसाद

सातपूर (नाशिक) : नाशिकच्या कोरोना रुग्णांना अवघ्या एक हजार २०० रुपयांत रेमडेसिव्हीर औषध उपलब्ध करून देण्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आवाहनाला सोमवारी (ता. २२) आणखी १४ विक्रेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

एक हजार २०० रुपयांत रेमडेसिव्हिर
गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरातील अनेक विक्रेत्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत अवघ्या एक हजार २०० रुपयांत रेमडेसिव्हिर हे औषध उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेत सहभाग नोंदविला आहे. सोमवारी शहरातील आणखी काही स्टॉकिस्ट व विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. सातपूरला डॉ. कराड हॉस्पिटलमध्ये झालेल्या या बैठकीत सातपूर येथील भावसार मेडिकलचे महेश भावसार, नाशिक रोडच्या व्हीकेआरएस फार्माचे नीलेश वाघ, पंचवटीतील निरामय मेडिकलचे मनोज उशीर, सिडकोतील ग्लोबल मेडिकलचे मनोज उशीर, पंचवटीतील लोकमान्य हॉस्पिटलचे केशव अहिरे, सुयोजित हॉस्पिटलचे पंकज जैन, कार्बन नाका येथील सुशीला हॉस्पिटलचे भूषण पिंगळे, संकल्प हॉस्पिटलचे अभिजित पाटील, मोतीवाला हॉस्पिटलचे गणेश पाटील, साईनाथ हॉस्पिटलचे समीर खैरनार, म्हसरूळच्या श्री ओम मेडिकलचे सचिन कोतवाल, सिडकोतील त्रिमूर्ती मेडिकलचे योगेश शिंपी, मेडिसिटी हॉस्पिटलचे मयूर शेवाळे, अशोका मार्ग येथील पायोनिअर हॉस्पिटलचे मयूर झवर आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील वितरकांनाही याबाबत कळविण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

विक्रेत्यांचे संपर्क क्रमांक 
* भावसार मेडिकल (सातपूर)- ९४०५५७८७७४ 
* व्हीकेआरएस फार्मा (नाशिक रोड)- ९०११५२४६२० 
* निरामय मेडिकल (पंचवटी) व ग्लोबल मेडिकल (सिडको)- ९८२३२३२७५५ 
* लोकमान्य हॉस्पिटल व सुयोजित हॉस्पिटल (पंचवटी)- ९७६५२५४८३४ 
* सुशीला हॉस्पिटल (कार्बन नाका)- ८८५५०५१०४२ 
* संकल्प हॉस्पिटल- ९३७३०२७७१४ 
* मोतीवाला हॉस्पिटल- ९८५०४७४४६० 
* साईनाथ हॉस्पिटल- ९६५७२७२४२२ 
* श्री ओम मेडिकल (म्हसरूळ)- ७३७८६७७०७० 
* त्रिमूर्ती मेडिकल (सिडको)- ८२०८५८४१४७ 
* मेडिसिटी हॉस्पिटल- ९४०३१७८९९१ 
* पायोनिअर हॉस्पिटल (अशोका मार्ग)- ८३९०९८८३७७ 

हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी