नाशिक शहरात उद्या पाणीबाणी; ‘या’ काळात पाणीपुरवठा बंद

नाशिक : शहरातील विविध भागांतील जलवाहिन्या दुरुस्त करण्यासाठी महापालिकेतर्फे शुक्रवारी (ता.१९) मोठ्या भागात सकाळ, दुपार व सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. 

नाशिक शहरात उद्या पाणीबाणी 
गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रास पुरवठा करणारी मुख्य पीएससी (सिंमेट) १२०० मीमी व्यासाची रॉ-वॉटर पाइपलाइन गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक, मनोहरनगर परिसरात नादुरुस्त झालेली जलवाहिनी दुरुस्त केली जाणार आहे. कालिका जलकुंभ येथील गुरुत्ववाहिनीचे गळती थांबविण्याचे काम केले जाणार आहे.

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवणार 

त्यामुळे पूर्वमधील प्रभाग क्र. १४ भागश:, १५ भागश:, २३ भागश:, ३० भागश: प्रभाग १६ पूर्ण, पश्चिम विभागातील प्रभाग ७, १२ व १३ मधील संपूर्ण भाग, पंचवटी विभागातील प्रभाग १,२,३,४,५ व ६ मधील संपूर्ण भाग, नाशिक रोड विभागातील प्रभाग १७, १८, १९, २०, २१ व २२. सिडको विभागातील प्रभाग क्र. २५ भागश:, २६ भागश: व २८ भागश: सातपूर विभाग प्रभाग ०८, ०९, १०, ११, २६ पूर्ण २७ चुंचाळे व दत्तनगर परिसरातील शुक्रवारी (ता. १९) सकाळ, दुपार व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही, तर शनिवारी (ता. २०) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना