नाशिक शहरात एक हजार मुलांमागे इतक्या ‘मुली’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गर्भलिंग निदान व गर्भ निवड करण्यास मनाईबाबतच्या कायद्यातील तरतूद कठोर असूनही मुलींचे प्रमाण वाढविण्याविषयी सर्वच स्तरावर अजूनही शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे दर हजार मुलांमागे मुलींचे कमी असणारे प्रमाण आजही चिंता निर्माण करणारे आहे. नाशिक शहरात हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण सद्यस्थितीत 888, तर मागील वर्षी 911 इतके राहिलेले आहे.

स्त्री-पुरुष समानतेबाबत शासनाकडून तसेच सामाजिक, शैक्षणिक संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर जागृती केली जाते. परंतु, आजही समाजाची मानसिकता वंशाचा दिवा म्हणून मुलांकडेच पाहण्याची असल्याचे दिसून येत आहे. जन्माआधीच लिंग निदान करून मुलींच्या गर्भाची हत्या घडवून आणली जाते. त्यामुळे अशा प्रकारची कृत्ये रोखण्यासाठी शासनाने गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा) कायद्यानुसार गर्भ निदान व गर्भ निवड करण्यास मनाई केलेली आहे. असे असूनही आज समाजात बर्‍याच कुटुंबांकडून वैद्यकीय क्षेत्रातील काही डॉक्टरांच्या मदतीने गर्भलिंग निदान चाचणी करून मुलींचा गर्भ पाडून टाकला जात असल्याच्या घटना घडत आहेत. याच घटनांमुळे बाललिंग गुणोत्तरात मोठा फरक निर्माण होत असून, हा फरक समाजासाठी घातक ठरू पाहणारा आहे.

नाशिक मनपा हद्दीत यंदा जानेवारी ते जून 2022 या सहा महिन्यांमध्ये मुलींचे प्रमाण एक हजार मुलांमागे अवघे 888 इतके आहे. महिनानिहाय मुलींचे प्रमाण असे : जानेवारी – 845, फेब—ुवारी – 973, मार्च – 873, एप्रिल – 842, मे – 887, जून – 907. त्याचबरोबर मागील वर्षी दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 911 इतके राहिले आहे. यंदाच्या तुलनेत मागील वर्षी मुलींचे लिंगगुणोत्तर समाधानकारक राहिलेले आहे.

दर तीन महिन्यांनी तपासणी
नाशिक शहर व परिसरात एकूण 322 इतकी सोनोग्राफी सेंटर्स आहेत. या सर्व सेंटर्सची तपासणी दर तीन महिन्यांनी महापालिकेच्या 40 वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत केली जाते. त्यात काही आढळल्यास संबंधित सोनोग्राफी मशीनचा परवाना रद्द करून केंद्र सील केले जाते. गेल्या दोन वर्षांत एकाही सोनोग्राफी सेंटरमध्ये गैरकृत्य आढळून आले नाही हे विशेष.

.. तर इथे
संपर्क साधा
सोनोग्राफी सेंटर वा इतरही कुठे गर्भलिंग निदान चाचणीसारखे गैरप्रकार आढळून आल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 18002334475 यावर संपर्क साधावा अथवा ुुु.रालहर्ळाीश्रसळ.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर माहिती द्यावी, असे आवाहन मनपा वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे. मुलगा आणि मुलगी याबाबत समाजात होणार्‍या भेदभावाविषयीची समाजातील मानसिकता बदलण्याची गरज असल्याचेही डॉ. नागरगोजे यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक शहरात एक हजार मुलांमागे इतक्या 'मुली' appeared first on पुढारी.