नाशिक शहरात कोरोनाचा भडका! आत्तापर्यंतची दिवसभरातील उच्चांकी रुग्णवाढ

नाशिक : जिल्‍ह्‍यात आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या संख्येत पुन्‍हा वाढ होऊ लागली आहे. शुक्रवारी (ता.2) दिवसभरात 3 हजार  995 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. यापैकी नाशिक महापालिका हद्दीतील 2 हजार 305 रुग्‍णांचा समावेश असून, ही आत्तापर्यंत एक दिवसात शहरात आढळलेल्‍या रुग्‍णांची उच्चांकी संख्या आहे. जिल्‍ह्‍यात दिवसभरात अठरा बाधितांचा मृत्‍यू झाला असून, 3 हजार 054 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. सध्या जिल्‍ह्‍यात 28 हजार 231 बाधितांवर उपचार सुरु आहेत. 

अठरा बाधितांचा मृत्‍यू

शुक्रवारी (ता.2) आढळलेल्‍या कोरोना बाधितांच्‍या संख्यने पुन्‍हा नवीन विक्रम प्रस्‍थापित केला. नाशिक शहरात 2 हजार 305 पॉझिटिव्‍ह नाशिक शहरातील आहेत. त्‍यापाठोपाठ नाशिक ग्रामीणमधील 1 हजार 513, मालेगाव महापालिका क्षेत्रातील 116, जिल्‍हा बाहेरील 61 रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. दिवसभरात झालेल्‍या अठरा मृत्‍यूंमध्ये नाशिक ग्रामीणमधील आठ, नाशिक शहरातील सहा, मालेगाव महापालिका क्षेत्रातील तीन तर जिल्‍हा बाहेरील एका बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमध्ये सटाण्यातील तीन, नाशिक तालुक्‍यातील जातेगावसह इगतपुरी, सिन्नर, नांदगाव, आणि मालेगाव ग्रामीण येथील प्रत्‍येकी एका बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. नाशिक शहरातील सहा मृतांमध्ये 28 वर्षीय युवकाचा समावेश आहे. याशिवाय पंचवटीतील म्‍हसरूळ, पेठरोड आणि मखमलाबादसह प्रभातनगर येथील प्रत्‍येकी एका बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. पिंपळनेर (जि.धुळे) व नाशिकला उपचार घेत असलेल्‍या बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.

बरे झालेले रुग्‍ण

नाशिक शहरातील एक हजार 884. नाशिक ग्रामीणमधील एक हजार 117 तर मालेगाव येथील तीन, जिल्‍हा बाहेरील पन्नास रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्‍ह्‍यात सध्या 28 हजार 231 बाधितांवर उपचार सुरु आहेत. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

संशयित रुग्‍ण संख्येत वाढ

जिल्‍ह्‍यात सायंकाळी उशीरापर्यंत 5 हजार 435 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यापैकी नाशिक शहरातील 3 हजार 181, नाशिक ग्रामीणमधील 1 हजार 881, मालेगावच्‍या 373 रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. दुसरीकडे संशयित रुग्‍ण संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. दिवसभरात 4 हजार 212 रुग्‍ण जिल्‍हा भरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दाखल झाले आहेत. यापैकी सर्वाधिक 3 हजार 997 रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात आठ, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात 31 रुग्‍ण दाखल झाले. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी