नाशिक शहरात संततधार सुरुच, धरणांमधील विसर्गात मोठी वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हवामान पूर्वानुमान विभागाने दिलेला अंदाज खरा ठरून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा संततधार सुरू झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. दारणा धरणातून रविवारी (दि. 24) सायंकाळी सहाला 7,244 क्यूसेक विसर्ग सुरू होता. तसेच नांदूरमध्यमेश्वर धरणातून 28,930 क्यूसेक विसर्ग सुरू होता.

जिल्ह्यात पाच जुलैपासून संततधार सुरू झाली. त्यानंतर मधल्या काळात पश्चिमेकडील सर्व तालुक्यांमध्ये जवळपास आठवडाभर अतिवृष्टी झाली. यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात मोठी वाढ होऊन नांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडीला जवळपास 40 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, पावसाची तीव—ता मधल्या दोन-तीन दिवस कमी झाल्यानंतर आता पुन्हा दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. गंगापूर धरणातून 3,486 क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला असून, होळकर पुलाखालून जवळपास 7,830 क्यूसेक वेगाने गोदावरी वाहात आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून रविवारी (दि.24) दुपारनंतर गाडगे महाराज पुलावरील वाहतूक बंद केली होती. नदीकाठच्या दुकानदारांना आणि रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरण साठा (% )
गिरणा 91
गंगापूर 65
काश्यपी 87
गौतमी 80
आळंदी 100
पालखेड 52
करंजवण 81
वाघाड 100
आझरखेड 100
पुणेगाव 75
तिसगाव 100
दारणा 68
भावली 100
मुकणे 86
वालदेवी 100
कडवा 76
भोजापूर 100
चणकापूर 100
हरणबारी 100
नागासाक्या 91
पुनद 47
नां.मध्यमेश्वर 54
एकूण 81 टक्के

हेही वाचा :

The post नाशिक शहरात संततधार सुरुच, धरणांमधील विसर्गात मोठी वाढ appeared first on पुढारी.