नाशिक : शहरात १३ लाखांपैकी अवघ्या “इतक्या’ जणांनीच घेतला बूस्टर डोस

बूस्टर डोस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शासनाच्या निर्देशानुसार नाशिक शहरात १८ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना कोरोना लशीचा बूस्टर डोस मोफत दिला जात आहे. शहरात पात्र असलेल्या १३ लाख ६३ हजार ७०० नागरिकांपैकी १ लाख ६४ हजार ३१६ लाभार्थ्यांनी मोफत बूस्टर डोसचा लाभ घेतला आहे. कोरोनाचे अद्याप संकट शमलेले नाही. त्यामुळे कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन मनपाने केले आहे.

नाशिक शहरात १३ लाख ६३ हजार ७०० नागरिक आहेत. त्यापैकी फ्रंटलाइन वर्कर आणि वय वर्ष ६० वरील नागरिकांनी पूर्वीच बूस्टर घेतला होता. १५ जुलै २०२२ पासून १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उर्वरित नागरिक मोफत बूस्टरसाठी पात्र आहेत. नाशिक महापालिकेला कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन लशीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे. नागरिकांनी आपल्या घराजवळील लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय विभागाने केले आहे.

कोविड १९ लसीकरण केंद्रांची नावे

कोव्हिशील्ड

पंचवटी विभागात

– मायको पंचवटी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

– मखमलाबाद शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

– नांदूर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

– हिरावाडी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

नाशिकरोड विभाग

– नाशिकरोड शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

– दसक पंचक शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

– सिन्नर फाटा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

– हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय

सातपूर विभाग

– मायको सातपूर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

नाशिक पूर्व विभाग

– वडाळा गाव शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

– भारतनगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

– एसजीएम शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

– उपनगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

नाशिक पश्चिम विभाग

– बारा बंगला शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

सिडको विभाग

– स्वामी समर्थ रुग्णालय, मोरवाडी

– पिंपळगाव खांब शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

– सिडको शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

कोव्हॅक्सिन

– रेड क्रॉस शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

– हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय

– डाॅ. झाकिर हुसेन रुग्णालय

– मायको सातपूर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

– सिडको शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

हेही वाचा :

The post नाशिक : शहरात १३ लाखांपैकी अवघ्या "इतक्या' जणांनीच घेतला बूस्टर डोस appeared first on पुढारी.